चीनच्या लसीला भारतातील मुस्लिम समुदायाचा विरोध; रझा अकादमीची बंदीची मागणी

फार्मा कंपन्यांकडून औषधांमध्ये डुक्कराच्या प्रथिनांचा वापर स्टॅबिलायझर म्हणून केला जातो. साठवणुकीदरम्यान आणि वाहतुकीदरम्यान संबंधीत औषध सुरक्षित आणि प्रभावी रहावं यासाठी त्याचा वापर केला जात. रझा अकादमीचे सरचिटणीस सईद नूरी यांनी एका व्हिडिओ निवेदनाद्वारे सरकारला आवाहन केलं आहे की, “सरकारने चिनी लस भारतात लसीकरणासाठी मागवू नये. कारण या लसीमध्ये डुक्कराच्या मांसातील प्रथिनांचा वापर करण्यात आला आहे.

जगभरात विविध प्रकारच्या करोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, यांपैकी काही लस या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. चीनने विकसित केलेल्या लसीबाबतही असाच वाद निर्माण झाला असून मुंबईतील मुस्लिम समुदयाने या लसीला विरोध केला आहे. या लसीमध्ये डुक्कराच्या मांसातील प्रथिनांचा वापरण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

रझा अकादमीचे सरचिटणीस सईद नूरी यांनी एका व्हिडिओ निवेदनाद्वारे सरकारला आवाहन केलं आहे की, “सरकारने चिनी लस भारतात लसीकरणासाठी मागवू नये. कारण या लसीमध्ये डुक्कराच्या मांसातील प्रथिनांचा वापर करण्यात आला आहे तसेच भारतानं परदेशातून मागवली किंवा भारतात तयार करण्यात आलेल्या लसीमध्ये कुठल्या पदार्थांचा वापर करण्यात आला आहे, याची यादी आम्हाला दाखवावी म्हणजे आम्हाला मुस्लिम समुदयासाठी लसीच्या वापरासंदर्भात घोषणा करता येईल”
दरम्यान, अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी देखील दावा केला आहे की, “अमेरिकेत तयार होणाऱ्या करोना प्रतिबंधक लसीमध्ये गायीच्या रक्ताचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे ही लस भारतात वापरली जाऊ नये. या प्रकाराला चक्रपाणी यांनी आंतरराष्ट्रीय कारस्थान संबोधत हिंदू धर्म उद्ध्वस्त करण्याचा हा डाव असल्याचं म्हटलं आहे. गोमुत्र किंवा शेणाचा वापर करण्यात आलेली लस किंवा औषधंच हिंदू वापरु शकतात. त्यामुळे परदेशी कंपन्यांनी त्यांची लस निर्मिती प्रक्रिया थांबवायला हवी.”

डुक्कराच्या प्रथिनांचा वापर केलेल्या लसीला युएईत परवानगी
करोना प्रतिबंधक लसीमध्ये डुक्कराच्या प्रथिनांचा वापर हा औषध म्हणून मानवी शरीर संरक्षित करण्यासाठी करण्यात आला आहे. खाद्य म्हणून हा वापर केलेला नाही. त्यामुळे इस्लामचा नियम या ठिकाणी लागू होणार नाही, असं युएईतील फतवा काउन्सिलचे शेख अब्दुल्ला बिन बयाह यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे युएईतील मुस्लिमांसाठी चीनच्या लसीला परवानगी देण्यात आली आहे.