सकल मराठा सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आज शुक्रवारी दि.25 डिसेंबर रोजी सायंकाळी प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले.ते जसं च्या तसं…
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाला सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की, आपला कॅबिनेटमंत्री विजय वडेट्टीवार यांना आवरा,हे आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत ज्या पद्धतीने विरोधी भूमिका मांडत आहे. याचा विचार करता भविष्यात मराठा समाजाने काँग्रेसला कोणते दिवस बघण्यास भाग पाडावे लागेल हे सांगण्याची गरज नाही.
काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या माती मध्ये उभा करण्यामध्ये मराठा समाजाचे प्रचंड योगदान आहे. आजही काँग्रेस पक्षामध्ये मराठा समाजाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. तरीही मंत्री विजय वडेट्टीवार हे मराठा समाजाला प्रत्येक वेळी ओबीसीच्या आरक्षणासाठी विरोध करत आहेत. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. काँग्रेसच्या राज्यातल्या व देशातल्या नेतृत्वाने याचा गांभीर्याने विचार करावा. अन्यथा मराठा समाजाच्या मतपेढीस भविष्यातल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मुकावे लागेल. याची दखल काँग्रेसचे नेतृत्व त्वरित घ्यावी अन्यथा मराठा समाज जागा दाखवून देईल असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मराठा आरक्षण हा मुद्दा न्यायालयाच्या कक्षेत आहे. मराठा समाजातील युवक -युवतींमध्ये शैक्षणिक दृष्ट्या आणि नोकरीसाठी महत्त्वपूर्ण असणारे मराठा आरक्षण स्थगित झाल्याने प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला आहे. या आगीत तेल ओतण्याचे काम काँग्रेसचा मंत्री करत आहे आणि त्याला थांबवण्यासाठी कॉंग्रेसचे इतर नेते मंडळी कुचकामी ठरत आहेत असे दिसून येत आहे. मराठा समाजाच्या भावनेशी खेळणाऱ्या काँग्रेसच्या मंत्र्याला वेळीच आवरा अन्यथा आज सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आम्ही इशारा दिला आहे. या आगीचे लोण संपूर्ण राज्यभर पसरण्यास वेळ लागणार नाही.
माऊली पवार
सकल मराठा समाज,सोलापूर जिल्हा


Leave a Reply