गॅस दरवाढ | सोलापुरात भर रस्त्यावर मांडल्या चुली ,केल्या भाकरी ; हटके आंदोलन…

सोलापूर शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज सोलापूर येथील चार पुतळा येथे केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीविरोधात निषेधात्मक आंदोलन करताना रस्त्यावर चूल मांडून त्यावर भाकरी थापत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले.

कोरोना महामारीच्या काळात आधीच सामान्य जनतेचे कंबरडे मोडलेले असताना केंद्र सरकारने नुकतेच गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करून सामान्य जनतेचे जगणे मुश्किल तर केले आहे. त्यामुळे अशा या निर्ढावलेल्या भाजपाच्या केंद्र सरकारच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्र महिला निरीक्षक भारती शेवाळे तसेच महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे यांच्या प्रमुख नेतृत्वात सोलापुरातील महिला पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी युवती पदाधिकारी यांनी आंदोलन केले.
बहुत हुयी मेहांगाई की मार, नहीं चाहिए मोदी सरकार

हाय हाय मोदी सरकार हाय हाय_

गांधी लढे थे गोरो से हम लढेंगे चोरो से

गॅस दरवाढ कमी झालीच पाहिजे

अशा घोषणांनी महिला व युवतींनी परिसर दणाणून सोडला होता.

 

आंदोलनाच्या वेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष संतोष पवार, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, निशांत सावळे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.
या आंदोलनाला युवती अध्यक्ष आरती हुळ्ळे नसीमा शेतसंदीं, गौरा कोरे, लता ढेरे, सुनिता गायकवाड साठे, आफ्रिन पटेल, कल्पना पारडे, उषा बेसरे, लताताई फुटाणे, पूजा ताजने, अस्मिता निकम, संगीता शहापूरकर, निकिता ताजणे, कोमल वसेकर, वंदना भिसे, जया नाकोड, सिया मुलानी, पुनम पवार, उषा बामणे, पूजा वाकसे, सुप्रिया लोमटे, , शशिकला कसपटे, नंदा जानकर, मंगल जगताप, कविता कोडवान, कांता बनसोडे आदी महिला व युवती पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तसेच तनवीर गुलजार, रुपेश भोसले, मिलिंद गोरे, युवराज माने, सोमनाथ शिंदे, बसवराज कोळी, ज्योतिबा गुंड, , पद्मसिंह शिंदे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.