सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा मानपत्र व सन्मानपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्वागत व प्रास्ताविक महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केले.महापौर श्रीकांचना यन्नम यांनी प्रास्ताविकामध्ये उपस्थिती असलेले मानपत्र व सन्मानपत्र मिळालेल्या ज्ञानवंत, गुणवंत ,यांचा आम्हा सर्व सोलापूर वासियांना गर्व आहे आपल्या कर्तृत्वामुळे आपल्या सोलापूर शहराचे नाव जागतिक स्तरावर आपण नेले आहे आपल्या अत्यंत कौतुकास्पद कार्याचा गौरव करणे हे आमचे कर्तव्य आहे तरी मी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आपणास विनंती करते की आमच्या या सत्कार आणि कौतुक सोहळ्याचे तुम्ही स्वीकार करावा तसेच मी येथे असलेल्या गुणवंत आणि यशस्वी भूमिपुत्रांना येणाऱ्या आगामी भूमिपुत्रांना तुमच्या योगदानाचा चारो ओळी सांगून त्यांना प्रेरित आणि मार्गदर्शन करावे आणि आपल्या सोलापूर शहराच्या प्रगतीस उत्तेजन द्यावे तसेच सर्व सोलापूर वासियांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी मानपत्राचे वाचन केले.त्यानंतर सोलापूर शहरातील ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष अरण्यऋषी मारुती चितमपल्ली प्रतिष्ठित उद्योजक यतीन शहा, ज्येष्ठ विधिज्ञ व जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, यांना सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या शुभहस्ते व खासदार डॉ. श्री जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार श्री सुभाष (बापू) देशमुख,आयुक्त पी.शिवशंकर सभागृह नेते श्रीनिवास करली यांच्या प्रमुख उपस्थितीत मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सोलापूर शहरातील कला क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, पत्रकार या क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळवलेल्या मोहन दाते, मुसा खान, मनीष केत, समाधान वाघमोडे, राजा माने, प्रशांत जोशी, स्वप्नील हरहरे, विजयकुमार पिसे, राजकुमार सारोळे, अशोक नावरे, अभय दिवाणजी, जयस्तुते फाउंडेशन, राजघराना प्रतिष्ठानझ इको फ्रेंडली क्लब, हरित वसुंधरा फाउंडेशन, भक्ती जाधव व त्यांचे तीन बंधू, अतिश कविता, लक्ष्मण शिरसाट, सुप्रिया बिराजदार,श्रीकांत ढेपे, सुरेश जाधव, ऋतिका श्रीराम, नारायण जाधव, प्रार्थना ठोंबरे, वसंत सरवदे, तृप्ती अवताडे, साईश्वर गुंटूक आदींना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.यावेळी मरणोत्तर सन्मानपत्र माजी आमदार युनूस भाई शेख व उत्कृष्ट पत्रकार म्हणून विजयकुमार सोनवणे यांना देण्यात आले.यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर जिल्हा ही संतांची भूमी म्हणून ओळख आहे सोलापूर शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील वैभव आहे त्या वैभवाची माहिती सोलापूर जिल्हा व्यतिरिक्त महाराष्ट्रात व देशात सांगण्याची गरज आहे यामुळे सोलापूरचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात व जगभरात होईल. तसेच शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्ती यांचीही ही माहिती ती सांगण्याची गरज आहे. यावेळी मारुती चितमपल्ली यांनी मानपत्र दिल्याबद्दल सोलापूर महानगरपालिकेचे आभार मानले तसेच यावेळी रजपूत वकील यांनी जुन्या गोष्टींना उजाळा देत ते म्हणाले की सोलापूर महानगरपालिकेत मी 1990 ते 1992 पर्यंत रोजंदारी कारकून म्हणून काम केले आहे. आज सोलापूर महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याला येथे मानपत्र देऊन सन्मान केला जातो त्या बद्दल मला अभिमान वाटतो सोलापूर मध्ये न्याय देण्याचे काम करत असताना समोरच्या व्यक्ती जो न्याय मागण्यासाठी आला आहे तो कोणत्या धर्माचा, पंथाचा किंवा जातीचा, स्त्री-पुरुष असं न पाहता समोरच्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचा एक जिद्द मनामध्ये ठेवून काम करत आहे आणि सोलापूरचे नाव लौकिक करायचा आहे. यावेळी आयुक्त पी. शिवशंकर यांनी महानगरपालिकेच्या वतीने विविध विकास कामे व सामाजिक कामे होतात लोकसहभाग असेल तर ते कामे चांगले व उत्तम होते आज आपला सन्मान करण्याचा संधी मिळालेली आहे आज येथे मानपत्र मिळालेले सर्व मान्यवर हे त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करत आहेत त्यांना सर्वांना पुन्हा एकदा महापालिकेच्यावतीने शुभेच्छा या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सभागृह नेते श्रीनिवास करली यांनी केली. यावेळी परिवहन सभापती जय साळुंके,गटनेते रियाज खैरादी,महापालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर,नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे,नगरसेविका सुनीता रोटे,नगरसेविका संगीता जाधव,नगरसेविका फ़िरदोस पटेल,नगरसेविका वहिदाबी शेख,नगरसेविका निर्मला तांबे,नगरसेविका शालन शिंदे,नगरसचिव प्रवीण दंतकाळे जयप्रकाश अमनगी,शेखर सकट,आदी मान्यवर उपस्थित होते
Leave a Reply