MH13 News Network
संपूर्ण शहरात त्याच्यासोबत महापालिका वर्तुळात विशेष म्हणजे भाजपाच्या गोटात खळबळ उडवून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेचे भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांना सोलापूर शहरातील गुन्हे शाखा यांच्याकडून आज मंगळवारी ताब्यात घेण्यात आले.
सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून खंडणी मागितल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे.
उपमहापौर राजेश काळे यांना अटक करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेतील कामगार संघटना आणि नेते एकवटले होते. महापालिकेत त्यासाठी काम बंद आंदोलन हाती घेण्यात आले होते .29 डिसेंबर पासून पोलीस उपमहापौर काळे यांच्या तपासासाठी फिरत होती. टेंभुर्णी पासून पुणे येथे जात असताना उपमहापौर काळे त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
पुण्याकडे जात असताना टेंभुर्णी हायवे वर फिल्म स्टाईल पाठलाग करून पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे ,पोलीस उपनिरीक्षक सचिन बंडगर, उपनिरीक्षक कुंभार व त्यांच्या पथकाने मोठया शिताफीने उपमहापौरांना ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त गुन्हे बापू बांगर ,साहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात
Leave a Reply