Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे संक्रांत निमित्ताने महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी म्हणून मकरसंक्रांतमध्ये लागणारे पौष्टिक कडधान्य आहार वाण म्हणून देण्यात आले.

अक्कलकोट एम.आय.डी.सी रोडवरील संगमेश्वर नगर विटभट्टी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे विटभट्टीचे मालक अमोल शिरशाड, संस्थेच्या मार्गदर्शिका ज्योती कासट, संस्थेचे संस्थापक महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिलांना बाजरी, गुळ, ज्वारी, शेगा, तीळ, गहू असे  विविध प्रकारचे धान्य वाण देण्यात आले.
याप्रसंगी शंकरव्वा जमादार, शोभा घंटे, अक्षता कासट, नेहा कासट, रुपा कुत्ताते, शिला तापडीया, सुजाता सक्करगी, वर्षा भद्रवती, माधुरी चव्हाण, रुचा चव्हाण, प्रियंका जाधव, रूचा जाधव, वैशाली गवते तसेच सोनाली आवटे, शिल्पा माशाळे, जगुबाई पवार, जयश्री कोळी, जगदेवी परीट, अनुसया बंदपट्टे, सुषमा केंगार, राधिका वाघमारे  यांच्यासह महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे रमेश हारके, कल्याण करजगी, शुभम हंचाटे, शुभम कासट, प्रसाद माने, मयुर गवते आदींसह कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

आहाराच्या दृष्टीने आहे महत्व…

मकरसंक्रांत हा एक शेती संबंधित सण आहे.  भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात.हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ हे हिवाळ्यात आहाराच्या दृष्टीने महत्व आहे. त्यामुळे हे वाण दिलं जातं. त्यांच उद्देशाने श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. असे प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *