माझे गांव कोरोनामुक्त गांव ; जनजागृती रॅलीचे आयेजन…

माझे गांव कोरोनामुक्त गांव या अभियानांतर्गत व शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर भंडारकवठे तालूका दक्षिण सोलापूर येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, पंचायत समिती सदस्य एम.डी.कमळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


सोलापूर जिल्ह्यात शासनाच्या निर्देशाप्रमाणे 27 जानेवारी पासून शाळा सुरु करण्याची प्रशासनाने जय्यत तयारी केलेली असून पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सूरु होत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक महसूली गावामध्ये शाळा सुरु करण्याबाबत व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सुरु केलेल्या माझे गाव कोरोनामुक्त गाव अभियानाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रभात फेरीत सर्व शासकिय/ निमशासकिय अधिकारी व कर्मचारी, शिक्षक व गावातील प्रतिष्ठित नागरीक सहभागी झाले होते.


भंडारकवठे तालूका दक्षिण सोलापूर येथे कोरोना संबंधी प्रतिबंधात्मक पंचसूत्री असलेल्या सुचनांच्या फलकासह लाऊडस्पिकरवर गावातील नागरीकांना आवाहन यावेळी करण्यात येत होते. प्रभात फेरी नंतर जिवन विकास प्रशाला येथील सभेमध्ये कोरोनासंदर्भात मार्गदर्शक सुचनांचे जसे की मास्क लावणे सोशल डिस्टंसींग पाळणे ईत्यादींचे गावकऱ्यांकडून पालन होत असल्या बाबत मुख्य र्काकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अभिनंदन केले. यावेळी मतदार दिना निमीत्त व कोरोनाचे सर्व नियम पाळण्याबाबत सर्व उपस्थित गावकऱ्यांना शपथ देण्यात आली.

यावेळी भंडारकवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्किय अधिकारी डॉ श्रीशैल नाईकवाडी जिवन विकास प्रशालेचे मुख्याध्यपक एस.एम नदाफ, जि.प.शाळा मुख्याध्यापक महादेव कमळे, माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठल पाटील, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले, ग्राम पंचायत सदस्य हणुमंत पुजारी, ग्राम विस्तर अधिकारी जिवराज कोळी, उपप्राचार्य बाजीराव बुळगुडे, माजी ग्रामपंचायत सदस्य हणमेतराव विजापूरे, आरोग्य सहाय्यक गिरीष जेटगी, ग्रामसेवक राठोड आदी उपस्थित होते.