स्वातंत्र्यसैनिक उंबरे यांचा जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते सन्मान

सोलापूर,दि.26 : माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ घेऊन सध्याच्या युवा पिढीला पर्यावरण संरक्षणसाठी जागृत करण्याचे काम करणाऱ्या 99 वर्षीय स्वातंत्रसैनिक शंकर मल्लिकार्जुन उंबरे (नरोटेवाडी, ता.उत्तर सोलापूर) यांचा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री. शंभरकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ. पंकज जावळे, जिल्हा समन्वयक बळीराम दगडे, नायब तहसीलदार डी. व्ही मोहोळे, अव्वल कारकून अविनाश गायकवाड, रवी नष्टे यांच्यासह महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होत.

स्वातंत्रसैनिक उंबरे यांचा या वयातला उत्साह तरुण पिढीलाही लाजवेल असाच होता. त्यांनी प्रत्यक्ष हजर राहून माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ घेतली. याबद्दल श्री. शंभरकर यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. त्यांना हरित शपथेचे प्रमाणपत्र देण्यात आले.