शेखर म्हेञे / माढा प्रतिनिधी:
माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संतोष आडगळे यांना सोलापुरातील लाचलुचपत विभागाने 9 हजारांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. या घटनेने तालुक्यातील शासकीय वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की…
तक्रारदाराच्या पत्नीला प्रसूतीसाठी कुर्डुवाडी ग्रामीण रूग्णालयात आणले असता प्रसूती( सिझर) करण्यासाठी डाॅ.आडगळे यांनी 10 हजार रुपयांची मागणी केली होती. या संबंधी तक्रारदाराने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर आज(शुक्रवारी) दुपारी 12 वा. लाचलुचपत विभागाने सापळा रचून डाॅ.आडगळे यांना रंगेहात पकडले. डॉ. संतोष अडगळे यांना ताब्यात घेतले असून जाब जबाब नोंदवण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गरिबांचा वाली कोण..
डॉक्टरने लाच स्वीकारल्याची बातमी वाऱ्यासारखी कुर्डुवाडी शहर व माढा तालुक्यात पसरताच नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. महागड्या दवाखान्यात जाऊन उपचार घेणे आमच्यासारख्यांना शक्य नाही .अशावेळी सर्वसामान्य गोरगरीब मंडळी सरकारी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी येतात.अशावेळी ज्यांना देवाचा दर्जा दिला जातो. अशा डॉक्टर मंडळींना लाच घेताना लाज का वाटली नाही. आम्हा गोरगरिबांचा वाली कोण ? अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
या कामगिरीत पुणे एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी या पथकास मार्गदर्शन केले. सोलापूरचे पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कविता मुसळे,अंमलदार पवार, सण्णके यांनी पार पाडली.
Leave a Reply