सरकारी कामात अडथळा निर्माण करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वजीत अशोक मुळीक व अशोक मुळीक असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की,आरोपी हे फौजदार चावडी पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदार कक्षात येऊन फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल तानाजी ब्रह्मदेव गवळी (वय-५२, नेमणूक फौजदार चावडी पोलिस ठाणे सोलापूर शहर) हे सरकारी काम करत असताना त्यांच्याशी आरोपी मुळीक यांनी हूज्जत घालून अरेरावीच्या भाषा केली.त्यानंतर फिर्यादी तानाजी गवळी यांना तुला येथे ड्युटी करायची नाही का असे म्हणून फिर्यादीस अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करून अंगावर धावून आले.फिर्यादी गवळी हे त्यांचे काम करीत असताना,सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौंजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोसई भोईंटे हे करित आहेत.
Leave a Reply