राजा शिवछत्रपतींच्या नावाने राजकारण करणारे राज्यकर्ते शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणाला मूठमाती दिली आहे. अन्नदाता सुखी तर राज्य सुखी म्हणून शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाई नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाला आदेश देणारे प्रजाहितदक्ष राजा शिवछत्रपतींच्या राज्यात बळिराजा न्यायासाठी गेली 82 दिवस झाले सरकारशी झगडू लागला.परंतु जनतेची लूट करणाऱ्या सरकार ला शिव प्रभूंच्या नितीने प्रत्युत्तर दिले पाहिजे असे परखड मत व्यक्त केले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी माकपचे राज्यसचिव माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माकप च्या नगरसेविका कामीनीताई आडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तदनंतर शिवाजी चौक येथील अश्वारूढ शिवाजी महाराज पुतळा येथे अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रास्तविक अँड.एम.एच.शेख यांनी केले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉ.अनिल वासम यांनी केले.
यावेळी व्यंकटेश कोंगारी, कुरमय्या म्हेत्रे, युसूफ मेजर, सिद्धप्पा कलशेट्टी,दीपक निकंबे,विक्रम कलबुर्गी, अशोक बल्ला, बाळासाहेब मल्याळ दत्ता चव्हाण, मल्लेशाम कारमपूरी, मीरा कांबळे, किशोर झेंडेकर, दाऊद शेख, इलियास सिद्दीकी, नरेश दूगाने, बजरंग गायकवाड, अकिल शेख, आसिफ पठाण, भारत पाथरूट आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply