Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

सोलापूर : खासदार डॉ. जयसिध्देश्वर स्वामी यांना बनावट जात प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी शिवसिध्द विठ्ठल बुळ्ळा (वय ५५, रा. तडवळ, अक्कलकोट) याची जामीन याचिका मुख्य न्याय दंडाधिकारी एस एम कनकदंडे यांनी फेटाळली.


खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी निवडणुकीत जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणात शिवसिध्द बुळ्ळा याला शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलीसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी त्याच्या घरातुन शासकीय स्टॅम्प सह अनेक वस्तु पोलीसांनी जप्त केले होते. दरम्यान न्यायालयाने बुळ्ळा याला न्यायालयिन कोठडी सुनावल्यानंतर त्याने जामीनीसाठी अर्ज केला. यावेळी सरकारी वकील अ‍ॅड़ पंडीत जाधव यांनी जोरदार हरकत घेत, या प्रकरणातील मुळ दाखला अजून जप्त केलेला नाही, सोबतच इतर आरोपींवरूद्ध आरोप निश्चीत झाले आहेत, पण त्यांना अटक झालेली नाही. हे प्रकरण राजकीय असल्यामुळे तपासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असून पुरावा नष्ठ करण्याची दाट शक्यता आहे असा युक्तीवाद त्यांनी केला. हा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरत आरोपीचा बुळ्ळा याचा जामीन नाकारला. याप्रकरणी सरकार पक्षाकडून अ‍ॅड. पंडीत जाधव यांनी काम पाहिले तर आरोपींकडून अ‍ॅड. फताटे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *