निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावर पालिकेवर भगवा फडकेल – पुरुषोत्तम बरडे

प्रभाग १९ मध्ये धुत्तरगांवकर यांच्या प्रयत्नातून ५२० मीटर जलवाहिनी टाकण्याचा शुभारंभ

थेट नागरिकांशी ज्यांचा संपर्क येतो, अशा निष्ठावंत शिवसैनिकांनी सातत्याने लोकहिताची कामं करीत राहिल्याने नागरिकांचा आशीर्वाद मिळतो आणि याच निष्ठावंतांच्या जोरावर आगामी काळात महानगरपालिकेवर भगवा फडकेल असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केले. प्रभाग क्रमांक १९ चे नगरसेवक व शिवसेनेचे शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर यांच्या प्रयत्नातून प्रभागातील किरण नगर, न्यू अंबिका नगर, सिध्देश्वर नगर भाग तीन आदी परिसरात ५२० मीटर जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ पुरुषोत्तम बरडे यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.


यावेळी उपशहरप्रमुख रविकांत कांबळे, बाळासाहेब माने, कोळप्पा विटकर, सचिन गंधुरे, आनंद मुसळे, सिध्दाराम खजुरगी, सचिन माने, अभिजीत जाधव, नरेंद्र क्षीरसागर, संतोष भोसले, अनिल गायकवाड, केदारनाथ बरगाले, राहुल गंधुरे विश्वनाथ अलकुंटे, दत्तात्रय सनके, सागर ढगे, देवीदास कोळी, तुकाराम चाबूकस्वार, अमित गडगी, देवा विटकर, गजानन केंगनाळकर, राज पांढरे, नजीर नदाफ, धानप्पा निंबाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.


पुरुषोत्तम बरडे पुढे म्हणाले की, कष्टकरी नागरिकांनी मत रुपी आशीर्वाद दिल्याने सामान्य कुटुंबातील गुरुशांत धुतरगांवकर नगरसेवक बनले. याची जाणीव ठेवत त्यांनी सर्वसामान्यांच्या जीवनातील कष्ट कमी करण्याचा सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केला आहे. विकासापासून वंचित असलेल्या या भागांमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन, दिवाबत्ती आणि रस्ते अशा मूलभूत सुविधा पोहोचविला गेल्या पाहिजेत यासाठी ते प्रयत्नशील असतात. अशाच प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावर आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना घवघवीत यश संपादित करेल व पालिकेवर भगवा फडकेल.


या परिसरातील नागरिक धीरज सोनवणे, सुजाता सोनवणे, पुष्पांजली सोनवणे, अशोक सोनवणे, सुष्मा माने, शिवाजी माने, सुमंगला कुंभार, शांताबाई कुंभार, विष्णू कुंभार, जयश्री श्रीशैल, मायनाळे ताई, विटकर जॉबर, अनिल कुंभार, अनिल बनसोडे, लता दुर्गदास मादास, सुजाता भीमनाथ, रेणुका भीमनाथ, सुनीता तीर्थ व गायकवाड ताई आदींच्या हस्ते पूजा करण्यात आली. मनपा पाणीपुरवठा विभागाचे अभियंता मल्लिनाथ चाकोते व विभागीय कार्यालयातील कुरमय्या म्हेत्रे यांनी काम व्यवस्थित होण्याकरिता देखरेखीची हमी दिली.