मोठी बातमी | मराठा आरक्षणावर 15 मार्चला होणार सुनावणी

मराठा समाजाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असणाऱ्या आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज सोमवारी सकाळी मराठा आरक्षणावरील सुनावणी 15 मार्च पासून सुरु होईल असे सांगितले.

कोर्टात काय झालं..
आरक्षण मर्यादा पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक करता येऊ शकते का याबाबत विचारणा करणार
मराठा आरक्षण प्रकरणी सुनावणी आता 15 मार्च पासून सुरु होणार
आहे,तर सर्व राज्यांना नोटीस देण्यास कोर्टाने परवानगी दिलीय. बहुप्रतिक्षीत असलेल्या मराठा आरक्षणवर 15 ते 17 मार्च दरम्यान सुनावणी होईल
मोठ्या खंडपीठाकडे सुनावणी होणार का याबाबत चाचपणी होईल.


सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत समाधानी असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.