-डॉ.माणिक गुर्रम
सोलापूर
आज समाजात महिला सक्षमीकरणाची सर्वत्र चर्चा,परिसंवाद,परिषदे भरवतात मात्र त्यांच्या खऱ्या प्रश्नांना समजून घेऊन त्याचे निदान करणे गरजेचे आहे.अष्टोप्रहर झटणाऱ्या महिलांच्या आरोग्याकडे महिला स्वतः च कारणीभूत असतात कारण घरसंसारात इतक्या रममाण होऊन जातात की ताणतणाव अंगावर काढण्याची सवय पडते.त्यामुळे अनारोग्याला सामोरे जावे लागते म्हणून महिलांनी नियमित पुरेसे व्यायाम, संतुलित सकस आहार, आवश्यक तेवढी झोप, दररोजच्या जेवणात सर्व रंगाच्या फळभाज्या,पालेभाज्या, कडधान्य, जीवनसत्त्वे, प्रथिने,कर्बोदके युक्त अन्न व मुबकल पाणी हे सुदृढ शरीरासाठी लागणाऱ्या प्राथमिक आवश्यक घटकांची पूर्तता केल्यास महिलांचे आरोग्य उत्तम राहील.हेच महिलांच्या आरोग्यासाठी गुरुकिल्ली आहे अशा शब्दांत मार्कंडेय सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉ.माणिक गुर्रम यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय जनवादी महिला संघटना सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दत्त नगर लाल बावटा कार्यालय येथे संघटनेच्या जिल्हाध्यक्षा शेवंता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महिलांच्या आरोग्य विषयक समस्या व निदान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संघटनेच्या राज्याध्यक्ष नसीमा शेख, नगरसेविका कामिनी आडम,माजी नगरसेविका नलिनीताई कलबुर्गी, सुनंदा बल्ला,डॉ.हरिष , सुवर्णा काळे,पुष्पा पाटील, मीरा कांबळे, दत्ता चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
स्वागत गीत वैशाली सुरवसे यांनी तर प्रास्ताविक संघटनेच्या जिल्हा सचिवा शकुंतला पानिभाते यांनी तर सूत्रसंचालन मीरा कांबळे तर आभार प्रदर्शन लिंगव्वा सोलापूरे यांनी केले.
विशेष म्हणजे कोरोनाग्रस्त आशा या किरोनावर मात करून कोविड योद्धा म्हणून कार्यरत असणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.
बेबीसरोजा वाघमारे,पूजा थडसरे,अंबिका बंडगर,रेणुका बुद्धाळ, हर्षदा गवळी,मनीषा भोसले, अलका सरवदे, चंद्रकला भोसले,विजयालक्ष्मी बिराजदार, यल्लमा तल्लरे, स्वाती शिंदे,सविता सुरवसे आदींचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शरिफा शेख,आरिफा शेख,शहानज शेख,गंगुबाई कणकी, सावित्री गुंडू, रसूल शेख,मुमताज टांगसाळ, दीपा देसाई,रेणुका गुंडला, अरुणा रासकोंडा, कल्पना टीकोले, आदींनी परिश्रम घेतले.
Leave a Reply