सोलापूर (प्रतिनिधी)
व्याजासह रोख रक्कम देण्याच्या कारणावरून खंडणी मागून दमदाटी केल्याप्रकरणी एका जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि घटणा दि. ७ फेब्रुवारी २०१८ ते १५ जानेवारी २०२१ दरम्यान सोलापूर येथे घडली.
याप्रकरणी यश राजेश शिंदे रा. सुराणा मार्केट,मेकॅनिक चौक असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,आरोपी यश राजेश शिंदे याने फिर्यादी रेश्मा इक्बाल शिलेदार (वय-४०,रा. आसरा चौक,टाकसाळ गल्ली,सोलापूर) यांना व्याजाने एक लाख ४० हजार रुपये वेगवेगळ्या व्याजदराने देऊन त्यांच्याकडून त्यांची बुलेट मोटारसायकल गहाण ठेवून घेतली होते.
यश शिंदे यांनी फिर्यादी कडून वेळोवेळी व्याज घेऊन फिर्यादीच्या मुलास नवी पेठ येथे दुकानात जाऊन तू मला व्याजासह चार लाख पन्नास हजार रुपये दे नाहीतर तू दुकान कसे उघडतो ते बघतो असे म्हणून खंडणी मागून दमदाटी केली. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोसई भोईटे हे करीत आहेत.
Leave a Reply