लसीकरण स्टंटबाजीवर पी.शिवशंकराची ‘लस’ असा दिलाय इशारा…

सोलापूर शहरात महानगरपालिकेच्या वतीने 13 नागरिक आरोग्य केंद्रावर व 12 प्रायव्हेट हॉस्पिटल येथे लसीकरण देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. लसीकरण देण्यासाठी शासनाच्या नियमानुसार 60 वर्षाच्या व्यक्ती यांना कोविड 19 ॲपच्या माध्यमातून नोंदणी केल्यानंतर त्यांना लस देण्यात यावे असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. तसेच 45 वर्षाच्या पुढील व्यक्ती ज्यांना शुगर,बीपी अथवा गंभीर आजार असेल अशा व्यक्तींनी मेडिकल सर्टिफिकेट घेऊनच कोविड 19 ॲप मध्ये नोंदणी केल्यानंतर त्यांना लस देण्यात येईल या सर्व गोष्टी करणे बंधनकारक आहे.

 

यामध्ये कोणीही दबाव टाकू नये अथवा स्टंटबाजी करू नये असे विनंती आहे जो कर्मचारी कोविड19 लसीकरणात काम करत आहेत त्यांनी सुद्धा नियमाचे पालन करावे अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. या अगोदर अशी एक घटना घडली आहे ते अत्यंत गंभीर असल्याने त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याची सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी नोंद घ्यावी. आपल्यावर कोणी दबाव आणत असेल तर त्यांनी वरिष्ठ अधिकारी यांना कळवावे त्यावर आम्ही निर्णय घेऊ असे आयुक्त पि.शिवशंकर म्हणाले.

हे आहे कारण …

काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारी यांनी नोंदणी न करता कोरोना लस घेतली. त्यावर महापालिका आयुक्तांनी नगरसेविका फुलारे यांना लस दिल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारला. डफरीन हॉस्पिटलमधील मानधनावरील डॉक्टर फिरोज मुलानी, यांच्यासह नर्स योगिता जाधव आणि अनुराधा काटकर यांची महापालिकेतील सेवा समाप्त केली, तर आरोग्य अधिकारी डॉक्टर बिरप्पा दुधभाते आणि डाटा ऑपरेटर सुरज कारंडे यांना मानधनाच्या दहा टक्के दंड केला आणि हा दंड मार्चच्या मानधना मधून वसूल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्री शिवशंकर यांनी दिले आहेत.