सोलापूर :
सोलापूर शहरांमध्ये वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोरोनाची तपासणी वाढ करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील सर्व भाजी मंडई येथील भाजी विक्रेत्यांना कोरोनाची तपासणी करून घेण्यासाठी ७ दिवसाची मुदत देण्यात आले होते. त्या अनुषंगाने एक आठवड्याभरात ३५० भाजी विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
या तपासणीत १८ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यापुढे भाजी विक्रेत्यांनी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात कोरोनाची तपासणी करून घ्यावी, तसेच चाचणी केल्याशिवाय भाजी विकू नये.भाजी मंडईत भाजी विक्री करतांना आपले कोरोनाची निगेटिव्ह अहवाल आपल्या जवळ ठेवावे, ज्यांच्याकडे रिपोर्ट नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
पुढील एका आठवड्यात सर्व दुकानदार व व्यापाऱ्यांनी कोरोनाची तपासणी प्रायव्हेट लॅबकडून करून घ्यावी असे आवाहन करतांना, सोलापुरात बाहेरगावावरून येणाऱ्या प्रवाशांचा ७२ तास अगोदर असलेला रिपोर्ट ग्राह्य धरले जाईल, असेही आयुक्त पी. शिवशंकर यांनी म्हटलंंय.
Leave a Reply