सोलापूर ग्रामीण | रुग्णसंख्येचा उच्चांक ; एकाच दिवशी तब्बल 579 कोरोनाबाधितांची भर तर मृत्यू… वाचा सविस्तर

सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 579 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज शुक्रवारी 2 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 579 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 371 पुरुष तर 208 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 268 आहे. यामध्ये पुरुष 173 तर 95 महिलांचा समावेश होतो .आज 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 6857 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 6278 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 46 हजार 580 इतकी झाली आहे. यामध्ये 29,028 पुरुष तर 17,552 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.