मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविड परिस्थितीवर राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेत आहेत. यात ऑक्सिजनची उपलब्धता, रेमिडेसेवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढवणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे.
या महत्त्वाच्या बैठकीत जवळपास दोन तास चर्चा सुरू आहे .बैठकीत करुणा उपाययोजनांवर चर्चा सुरू असून इतर मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करत आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकार कोरोनाची साखळी तुटण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. कडक निर्बधानंतर देखील नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. मात्र, लॉकडाऊन किती दिवसांचा करायचा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची आज (रविवार) कोरोना टास्क फोर्ससोबत बैठक झाली. टास्क फोर्समधील ज्येष्ठ सदस्यांनी किमान 2 आठवडयाचा लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे. आता याबाबत अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार आहे. त्यासाठी सोमवारी (उद्या) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास टास्क फोर्स मधील सदस्यांसोबत मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे. त्यानंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्यात लॉकडाऊन लागणार हे जवळपास निश्चितच मानले जात आहे.
Leave a Reply