दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव मानवी जीवनावर मोठा परिणाम करत आहे. सोलापूर शहरात असाच एक धक्कादायक परिणाम दिसून आला.
कोरोनाच्या भीतीने विजयपूर रोडवरील मंत्री चांडक रेसिडेन्सी येथील राहत्या घरी एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला.
हकीकत अशी की..
रेखाराणी अमर मुंडे(३७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. रेखाराणी यांचे पती अमर मुंडे यांना कोरोना झाला होता. खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार करून पंधरा दिवसानंतर ते घरी आले होते. त्यानंतर त्यांच्या मावस भावाला कोरोना झाला होता. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भावांना डब्बा घेण्यासाठी अमर मुंडे दवाखान्यात जात होते. यापुर्वीच अमर मुंडे यांना कोरोना झाला होता, त्यामुळे पुन्हा तुम्ही डबा द्यायला जाऊ नका, असं रेखाराणी अमर मुंडे यांना वारंवार सांगत होती. सोमवारी रात्री अमर मुंडे हे घरी आले. तेव्हा दोघं पती-पत्नी मध्ये किरकोळ कारणांवरून वाद झाला. अमर मुंडे यांनी तू भिऊ नको. उद्या तुला गावाकडे पाठवतो असे म्हणले आणि घराच्या बाहेर येऊन बसले. तेव्हा रेखाराणी यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पती अमर व लोकांनी यांना खाली उतरून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे येथील परिसरात मोठी खळबळ उडाली होती.


Leave a Reply