मोठी बातमी | कुर्डूवाडी येथील ‘या’ ठिकाणी भीषण आग…

कुर्डूवाडी (भोसरे हद्द) येथील उपविभागीय महावितरण कार्यालयासमोरील असणाऱ्या दोन हॉटेलसह, वेगवेगळ्या प्रकारच्या सात दुकानांना विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागल्याने संपुर्ण दुकाने जळून खाक झाली. यामध्ये सर्वांचे मिळून सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी लागलेली आग इतकी भीषण होती की त्याला भिजवण्यासाठी येथील नगरपालिका व विठ्ठल कारखान्याच्या दोन अग्निशमन दलाच्या गाड्यांना अर्धा तास वेळ लागला.

या शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत राहुल माने व सिद्धेश्वर गवळी यांनी दोन वेगवेगळे हॉटेल, ढेरे यांचे टेलरिंगचे दुकान, तन्वीरचे पंचरचे दुकान, काशीदचे सलूनचे दुकान, एक सायकल दुकान व अजून एका दुकानाचा समावेश होता असे मिळून एकूण सात दुकानांचे समावेश आहे. या सगळ्या दुकानातील साहित्याचे अक्षरक्ष जळून राख झाली असून, लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर तेथे जमलेल्या लोकांनी पोलिसांना फोनद्वारे घटना सांगितली.

त्यावेळी लगेच पोलीस तेथे पोहोचले तोपर्यंत नगरपालिका यांचेकडील अग्निशमन दलाच्या जवानांनी एक गाडी आणून आग विझविण्याचा सुरुवात केली, तोपर्यंत विठ्ठल कारखान्याकडील अग्निशमन दलाच्या जवानांनी ही एक गाडी घेऊन येत त्यास मदत केली. त्यामुळे संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात मदत झाले. घटनास्थळी पोलिसांनी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली असून घटना नेमकी कशी घडली याचा तपास चालू आहे.