राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 मेपर्यंत राज्यातील लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) कायम राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली. कोरोना रोखण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसापासून याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या.
महाराष्ट्रात लॉक डाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आला असून राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. यावेळी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लॉकडाऊन ही काळाची गरज असल्याचे सांगितलं.
कोरोना रूग्णांची संख्या (Corona Patient) स्थिर असली तरी कमी होत नसल्यानं लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन कालावधी वाढवण्यावर शिक्कामोर्तब झालंय.
Leave a Reply