सोलापूर -: राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्या पार्श्वभूमीवर व मराठा आरक्षणाच्या पुढील कायदेशीर लढाबाबत मराठा क्रांती मोर्चाने बैठक घेतली. या बैठकीत केंद्र व राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी केली. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने मराठ्याचे शैक्षणिक व नोकरीत मोठे नुकसान होणार आहे. त्यामु़ळे मराठा युवकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष निर्माण झाला असून याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने ऑट्रोसिटी कायद्याच्या धर्तीवर संसदेच्या दोन्ही सभागृहात मराठ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने कायदा करून त्याला अनुसूची 9 चे संरक्षण द्यावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली. तससेच सध्याच्या कोरोना महामारीत मराठा युवकांनी थोडा धीर धरावा आणि हिंसक आंदोलन करू नये, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. तसेच मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व आरक्षणासाठी यापुढेही मराठा क्रांती मोर्चा सक्रिय कार्यरत राहणार आहे.
तसेच मराठा क्रांती मोर्चा सोलापूर यांचेवतीने शासनाकडे पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
1. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी.
2. जिल्हास्तरावर मराठा विद्यार्थी/विद्यार्थीनी साठी स्वतंत्र वसतिगृहे चालू करावीत.
3. अण्णासाहेब पाटील महामंडळाची व्याप्ती वाढवून 1000 कोटीचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा.
4. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देवून बाजार समितीत मोफत भोजन व निवास व्यवस्था करावी.
5. कोरोनो महामारीच्या संकटात सापडलेल्या मराठा युवकांना स्वयंरोजगारांना रोजगार उभारण्यासाठी आर्थिक मदत द्यावी. तसेच कोरोनाबाधित सर्व शेतकर्यांचा मोफत औषधोपचार करावा.
6. सारथीमार्फत जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि उद्योजक विकास केंद्र स्थापन करावे.
7. सर्व पक्षीय खासदारानी राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांना भेटून मराठा समाजाच्या विकासाच्या दृष्टीने संसदेत कायदा करून घ्यावा.
अश्या मागण्यासह, शांततेच आवाहन या बैठकीत करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप कोल्हे, प्रताप चव्हाण, श्रीकांत घाडगे, दास शेळके, सुनील रसाळे, नाना मस्के, अमोल शिंदे, शशी थोरात, योगेश पवार, राम गायकवाड, संजय शिंदे, बाळासाहेब गायकवाड, विशाल भांगे, विजय पोखरकर, दिनेश जाधव, शेखर फंड, संजय पारवे, शिरीष जगदाळे, रतिकांत पाटील, जयवंत सुरवसे, विष्णु माने, नागेश घोरपडे, अनिल मस्के यांचेसह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.
Leave a Reply