आता…म्युकरमायकोसिस रूग्णांना मिळणार महात्मा फुले योजनेचा लाभ ; यांना करावा संपर्क…

 सोलापूर,दि.2: जिल्ह्यामध्ये कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिस आजाराचे प्रमाण वाढत आहे. सामान्य रूग्णांना या आजारावर महागडे उपचार घेणे शक्य होत नसल्याने शासनाने महात्मा जोतिबा फुले योजनेतून त्यांच्यावर उपचार करण्याचे निश्चित केले आहे. जिल्ह्यातील पाच रूग्णालयात रूग्ण महात्मा फुले योजनेतून मोफत उपचार घेत असल्याची माहिती योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. दीपक वाघमारे यांनी दिली.

            जिल्ह्यात अधिग्रहित केलेल्या पाच रूग्णालयात रूग्णांवर मोफत उपचार होत असून योजनेतील रूग्णालयांनी औषधांची मागणी केल्यास त्यांना जिल्हा शल्यचिकित्सकाकडून मोफत औषधे देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

            छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय (सिव्हील), श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रूग्णालय ॲन्ड रिसर्च सेंटर, यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रा.लि., अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, कुंभारी, गंगामाई हॉस्पिटल सोलापूर येथे महात्मा फुले योजनेत म्युकरमायकोसिसवर मोफत उपचाराची सोय करण्यात आली आहे.

            अधिक माहितीसाठी अंगीकृत रूग्णालयाच्या आरोग्य मित्रांशी संपर्क साधावा. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय (सिव्हील)- (आरोग्यमित्र सीमा गाडे-9730628629, मोहसीन शेख-9620356636, अमोल शिंदे-9922882505 आणि प्रवीण गायकवाड-7499814198), श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रूग्णालय ॲन्ड रिसर्च सेंटर- (आरोग्यमित्र उमेश जमादार- 9173923310, महेश बडगिरे-9689750526), यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रा.लि.-(आरोग्यमित्र-शशिकांत सकट-8788141471), अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, कुंभारी (आरोग्यमित्र- नासीर निगेबागवान-9405233493, श्यामसुंदर टंकसाळ-9096189255) आणि गंगामाई हॉस्पिटल (आरोग्यमित्र-शिवशंकर वळसंगे-9673801907).

            जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसच्या रूग्णांनी घाबरून न जाता उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.