Big9news Network
भारतातून परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरण करून घेणे अनिवार्य करण्यात आले असून ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे. अशा विद्यार्थ्यांचे लसीकरण दिनांक 10-6- 2021 रोजी विशेष बाब म्हणून मनपा प्रशासनाच्यावतीने करण्यात येणार आहे. परदेशातील नामवंत विद्यापीठात शिक्षणासाठी जाणे ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची बाब असून केवळ लसीकरण अभावी शहरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ही यामागची प्रशासनाची भूमिका आहे अमेरिका, युरोप व इतर बहुसंख्य देशांमध्ये कोव्हीशिल्ड ही लस मान्यताप्राप्त असल्यामुळे या विद्यार्थ्यांना कोव्हीशिल्ड लस देण्यात येणार आहे.
सदर विद्यार्थ्यांनी 09-06-2021 रोजी मदर तेरेसा पॉलीकेलिक्निक, डफरीन हॉस्पिटल कॅम्पस, डफरीन चौक सोलापूर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे. परदेशी विद्यापीठातून पदवीपूर्व व पदव्युत्तर तसेच पीएचडीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे लसीकरण देय राहील.विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.आधार कार्ड, पासपोर्ट ऑफर लेटर तसेच विझा व पासपोर्ट कागदपत्रांची छाननी अंती पात्र विद्यार्थ्यांना 10-6-2021 रोजी तेरेसा पॉलीकेलिक्निक, डफरीन हॉस्पिटल कॅम्पस, डफरीन चौक सोलापूर येथे लसीकरण करण्यात येईल. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिली.
Leave a Reply