‘गणपतराव देशमुख राजकारणातील तपस्वी’ : आ. सचिन कल्याणशेट्टी

BIG 9 NEWS NETWORK

राज्यातील राजकारणातील गणपतराव देशमुख हे तपस्वी होते. आदर्श राजकारणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून भाई गणपतराव देशमुख हे कायम राज्याच्या स्मरणात राहतील. त्यांच्या जाण्याने राज्याची मोठी हानी झाली आहे. राजकारण करत असतांना त्यापलीकडे जाऊन सामाजिक क्षेत्राची जवळीक हि त्यांची आदर्शवत प्रेरणा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. सोलापूर जिल्ह्यात गणपतराव देशमुख यांचा जन्म होणे. ही संपूर्ण जिल्ह्यासाठी भाग्याची बाब आहे. ऋषितुल्य, तपस्वी, संघर्षशील ,शेतकरी चळवळीत अग्रभागी राहून कष्टकरी – कामगारांसाठी आयुष्य वेचणाऱ्या गणपतराव देशमुख यांना विनम्र अभिवादन