BIG 9 NEWS NETWORK
सोलापूर: जि. प. प्रा. केंद्रशाळा बाळे येथे सोमवार दिनांक २ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११:०० वा. “एक पद एक वृक्ष” या अभियानांतर्गत जि.प. प्रा. केंद्रशाळा बाळे व वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बाळे येथे वृक्षारोपण करण्यात आले.
WCAS च्या वतीने बाळे परिसरात १५०० वृक्षारोपण संकल्पना राबविण्यात येत आहे, त्याची पुर्णतः कडे वाटचाल होत आहे. याच अनुषंगाने बाळे येथे वृक्षारोपण कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिवगुंडे मॅडम यांनी केले. संतोषभाऊ धाकपाडे यांनी लावलेल्या वृक्षांच्या सुरक्षेसाठी ट्री गार्डची सोय करण्याचे आश्वासन दिले. तर मुख्याध्यापक श्री. कासेगावकर सरांनी आभार मानले.
या कार्यक्रमास मा. श्री. प्रभाकर कस्तुरे, WCAS चे संतोषभाऊ धाकपाडे, सुरेश क्षीरसागर तसेच शाळेतील मुख्याध्यापक श्री. कासेगावकर सर, श्रीमती खैराट मॅडमश्रीमती शिवगुंडे मॅडम, श्रीमती गायकवाड मॅडम, श्रीमती राठोड मॅडम, श्री . विटकर सर, श्री. सरवळे सर व ग्रामस्थ उपस्थित होते.
वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूर
Leave a Reply