Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

Big9news Network

महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औदयोगिक शाळा, महानगरपालिकेसमोर, सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळ, (MSBV) मुंबई अंतर्गत शिवण व कर्तन , फॅशन डिझायनिंग व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु आहेत .तरी सदर व्यवसासचे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा

सदर व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये शिवण व कर्तन प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 10 वी पास असून, प्रवेश क्षमता 25 इतकी आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असून शुल्क 480 रुपये इतके आहे. तसेच फॅशन डिझायनिंग प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 10 वी पास असून, प्रवेश क्षमता 25 इतकी आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असून शुल्क 480 रुपये इतके आहे.

आजच्या युगात आत्मनिर्भर बनणे काळाची गरज आहे. सदर प्रशिक्षण उत्तम पर्याय असून, महिला व पुरूष यांच्याकरीता घरात बसून स्वत:चा व्यवसाय निर्माण करता येईल. तसेच प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर शासकीय प्रमाणपत्र मिळते, त्या अंतर्गत व्यवसाय करण्याकरीता कर्ज मिळते व बचत गट निर्मीती करु शकता. या कोर्स मध्ये शिवणाचे विविध प्रकार,टिपा मारणे, रंगसंगती, कपड्यावर कलाकुसर, विविध प्रकारचे कपडे शिवणे याचे प्रशिक्षण दिले जाते.

अधिक माहितीसाठी श्री.कंपली आर एम. यांच्या भ्रमणध्वनी क्र. 9284528609 यावर संपर्क साधवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *