Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

MH 13 News Network

एसटी आणि fortuner या गाडीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला आहे.या अपघातात दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी गावचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे यांच्यासह तीनजण जागीच ठार झाले. ही घटना कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील बसवकल्याणच्या जवळपास घडल्याचे समजते. यात चिदानंद सुरवसे यांचा ड्रायव्हर काळे याचाही जागीच मृत्यू झाला आहे.

मृत चिदानंद सुरवसे (वय 47) यांची फॉर्च्यूनर गाडी एम एच 13 सी एस 3330 ही कर्नाटक राज्यातील एसटी क्रमांक के ए 22 एफ 2198 ला धडक झाल्यानंतर पलटी होऊन चक्काचूर झाल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. या अपघातानंतर चौघेही जागीच ठार झाले आहेत. सुरवसे यांच्यासोबत पवार, वाहन चालक काळे आणखी एकजण होता. त्याचे नाव अद्याप ही समोर आलेली नाहीत. दरम्यान या चारी मृतदेहांना विजयपूर मधील शासकीय हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे तातडीने घटनास्थळी निघाले आहेत.त्याच सोबत सुरवसे यांचे कुटुंबीय ताबडतोब विजयपूर कडे रवाना झाले आहेत. चिदानंद सुरवसे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक होते. नांदणीचा अनेक वर्षे सरपंचपदी त्यांनी कार्यभार पाहिला.
सोलापुरातील अनेक दिग्गज राजकारणी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यासोबत त्यांचा परिचय होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *