Big9news Network
परकीय सत्तेविरूद्ध आवाज उठवणारे महाराजा यशवंतराव होळकर यांचा ६ जानेवारी रोजी राज्याभिषेक दिन सोहळा पुणे जिल्ह्यातील वाफगाव येथे पार पडणार आहे .यासाठी होळकर वंशज भूषणसिंह राजे होळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वतःचा राज्याभिषेक करणारे व ब्रिटिशांना पहिल्यांदा विरोध करणारे सार्वभौम महाराजा यशवंतराव होळकर हे धुरंधर व पराक्रमी राजे होते. त्यांचा हा पराक्रम तरुण पिढीला न्यात होण्यासाठी होळकर राजघराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांच्या संकल्पनेतून मागील काही वर्षापासून पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर जवळील वाफगाव किल्ल्यात महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. वाफगाव येथील हा भुईकोट किल्ला दुर्लक्षित असून त्याचे संवर्धन व संरक्षण व्हावे यासाठी भूषणसिंह राजे होळकर हे मागील काही वर्षापासून शासनाचे याकडे लक्ष जावे. व या किल्ल्यास गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत.
वाफगाव येथे सकाळी ९.३० वाजता विविध कार्यक्रमाने सुरुवात होणार असून होळकर राजघराण्यातील व समस्त भारतवासीयांच्या उपस्थितीत ग्रामदेवतादर्शन, मंगल वाद्याचा निनाद,गडपूजन, ध्वजारोहण, तळी भंडार, विशेष सत्कार , होळकर राजपरिवार व शहीद जवान कुटुंबियांच्या हस्ते राज्याभिषेक असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
यावेळी मराठी साम्राज्य विस्तार करण्यासाठी कामी आलेल्या अनेक सरदार घराण्याच्या वारसांना आमंत्रित करण्यात आली आहे.
- अशा या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन होळकर राजघराण्याचे वंशज श्रीमंत भुषणसिंह राजे होळकर यांनी केले आहे.