माढा | चुरस वाढली ; 4 जागासाठी 13 उमेदवार रिंगणात

Big9news Network

शेखर म्हेत्रे/ माढा प्रतिनिधी

शासनाकडून ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्यात आले होते परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण स्थगिती मुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीत ओबीसी साठी आरक्षित असलेल्या जागा वरील निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली होती त्यामुळे राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका पुढे ढकलण्यात याव्या नाहीतर ओबीसीचे 27 टक्के आरक्षण आहे तसेच ठेवून निवडणुका घेण्यात यावी अशी याचिका दाखल केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळत ओबीसी साठी आरक्षित असलेल्या जागांवर सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक घेण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे उर्वरित 4 जागांवर 18 जानेवारीला मतदान होत आहे.

त्यासाठी माढा नगरपंचायतच्या चार जागा साठी 27 जणांने उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यातील छानणीत 10 अर्ज अवैध झाले असल्याने 17 उमेदवारी अर्ज राहिले होते अर्ज माघार घेण्याची 10/1/2022 अंतिम तारखेला 4 जणांनी आपलं अर्ज माघार घेतल्याने 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत.

चार प्रभागातील निवडणुकीत प्रभाग क्र.14 मध्ये पंचरंगी , प्रभाग क्रमांक 7 व 9 मध्ये तिरंगी, प्रभाग क्रमांक 5 दुरंगी लढत होणार आहेत.

प्रभाग निहाय उमेदवारांची नावे –

प्रभाग क्रमांक 5 – सुनीता आजीनाथ राऊत(कॉंग्रेस), योजना प्रमोद साठे (अपक्ष)
प्रभाग क्रमांक  7 – अर्चना आनंदराव कानडे, ( शिवसेना) अर्चना महेश चवरे(कॉंग्रेस), संजना सचिन चवरे ( राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक 9- पृथ्वीराज राजेंद्र चवरे(शिवसेना), चंद्रशेखर रंगनाथ गोटे(राष्ट्रवादी),स्नेहश्री शैलेश कुर्डे(काॅग्रेस),
प्रभाग क्रमांक 14- नितीन हनुमंत साठे(काॅग्रेस), रोहित निळकंठ पवार (शिवसेना), योगेश बबनराव पवार (राष्ट्रवादी),दौलतराव दत्तात्रय साठे, (अपक्ष)दिनेश गोपीनाथ जगदाळे (अपक्ष)