Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट
  • महेश हणमे,/9890440480

एक नाही दोन नाही तब्बल सात दिवसापासून तुमचं सोलापूर गुदमरतेय. शेकडो माय भगिनी आणि मुलांना घशाचा, डोळ्याचा त्रास होतोय. उन्हाने होरपळलेल्या शहराला कचरा डेपोची धग आणि धूर कासावीस करत आहे. पण एक ही पुढारी आणि कारभारी यावर अवाक्षर बोलत नाही. जणू काही सोलापूरशी नाळ तुटली की काय.?.असा सवाल निर्माण होत आहे.

उन्हाचा कार घराबाहेर धुराचा कार 

सोलापूरला आमदार, खासदार आहे का? महापालिकेचे कारभार करणारे कारभारी कुठे गेले. गल्लोगल्लीत , वार्डात फिरणारे प्रभागातील पुढारी इलेक्शन पुढे गेल्यामुळे  गडप झालेत की काय?असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

निवडणुकीचे बिगुल वाजताच वाढदिवस,लग्न समारंभ,अंत्यविधी, डोहाळे जेवण सुद्धा उपस्थित राहून कुटुंबातील एक घटक असल्याचे मिरवणारे पुढारी, माजी नगरसेवक, विद्यमान आमदार,खासदार सोलापूर गुदमरत असताना नेमकं काय करत आहेत हा सवाल सोलापूरकरांना नक्कीच पडला आहे.

एक कचरा डेपो विझावण्याची क्षमता सुद्धा महापालिका प्रशासनाकडे नसावी ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. विशेष म्हणजे दरवर्षी हीच समस्या असते.

महापालिका प्रशासनावर अधिकारी मंडळी आहेत. लोकहिताच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने गेल्या सात दिवसात काय केले.? आणि कचरा डेपो विझवण्यासाठी नेमकी कोणती तातडीची उपाययोजना करणार याबाबत एक ही पुढारी, कारभारी समोर आला नाही हे सोशिक सोलापूरकर यांचं दुर्दैव आहे.

आगामी निवडणुकीत जनता विसरभोळी ठरणार नाही. कोरोना नंतर आलेल्या या प्रदूषण संकटाचे नक्कीच सोलापूरकर सामना करतील. पण मत मागण्यास येणाऱ्या पुढारी, भावी नगरसेवक मंडळीना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटत आहे.

एक सर्वसामान्य सोलापूरचा नागरिक म्हणून मनात निर्माण झालेले काही प्रश्न

1. इतक्या मोठ्या कचऱ्याच्या साठ्याचे व्यवस्थापन कसे होते!जर व्यवस्थापन असते तर इतका साठा राहतो कसा?

2.जेव्हा तुम्हाला माहित आहे की सोलापुरात उन्हाळ्यामध्ये तापमान 42-43° पर्यंत जाते आणि आग लागण्याची संभावना जास्त आहे तर मग आधीच खबरदारी का घेतली नाही?आग लागल्यावर बघू अशी भूमिका झाली ही.

3.आग लागून 7 दिवस झाले अजून पाण्याचा बंब सोडून दुसऱ्या काही उपाय योजना disaster management म्हणून काही केल्या गेल्या आहेत का?इतक्या दिवसांनंतर पण अजून मिटिंग च चालू आहेत. हे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदल्यासारखे झाले.हेच मुंबई किंवा पुण्यात घडले असते तर हेलिकॉप्टर ने पाणी टाकून आग विझवायचा प्रयत्न नक्कीच केला गेला असता

4.प्रथमदर्शनी ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत संथपणे आणि हलक्यात घेतल्या जात आहेत असे वाटते जणू काही झालेच नाही.

5.कचरा डेपो पासून हिप्परगा इतक्या जवळ असताना तिथल्या पाण्याचा वापर का नाही केला गेला.वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचले असते.आणि पाणीही मुबलक मिळाले असते.

6.आधीच कोरोना ने त्रस्त झालेल्या लोकांच्या फुप्पूसांची हालत खराब आहे त्यात हा धूर!कचरा डेपो पासून पार बळीवेस पर्यंत पसरला आहे,मास्क।वापरायचा सल्ला दिला जात आहे,पण धूर श्वासावाटे आत जाणारच.

7.परत भविष्यात असे घडू नये म्हणून आतापासून कचरा व्यवस्थापन करण्यासाठी योग्य ती पावले उचलली आहेत का ते जनतेला कळणे गरजेचे आहे.

ब्रिजेश कासट 

टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे इतर देशात जंगलाला लागलेल्या आगी वर नियंत्रण मिळवता येते ,पण आपल्या सोलापुरात साध्या कचरा डेपोला लागलेल्या आगी वर नियंत्रण मिळवता येत नाही हे दुर्दैव .शेजारी हिप्परगा तलाव असून सुद्धा ! जे लोग उमा नगरी ,बुधवार पेठ ,सम्राट चौक, भवानी पेठ ,मार्केट यार्ड ,तुळजापूर रोड, या भागात राहतात त्यांना या धुराचा भयंकर त्रास होत आहे .तसेच या कचरा डेपोच्या दुर्गंधीचाही त्यांना त्रास होत आहे. महाराष्ट्रात शहराच्या जवळ असणारा कचरा डेपो क्वचित आपला सोलापूरचा असेल ! इतर शहरातील कचरा डेपो हे शहरापासून अत्यंत दूर वरती आहेत तसेच त्याच्यावर प्रक्रिया करणारे उपक्रम ही त्या त्या भागात चालू आहेत पण त्याबाबतीत सोलापूरचा दुर्दैवच म्हणावे लागेल.
हनमे सर आपण सोलापूरच्या प्रश्नाबाबत कायम पाठपुरावा करीत आहात. तरी याबाबतीत महापालिका आयुक्त यांच्याशी संपर्क साधून तो कचरा डेपो इतरत्र हलवण्यासाठी आपण प्रयत्न करावा .तसेच संरक्षण विभागातील एखादे हेलिकॉप्टर बोलावून घेऊन ती आग विझवण्याचे साठीचे प्रयत्न आयुक्तांनी करावी याबाबत आपण प्रयत्नही करावा. इतर वेळेस ही यंत्रणा मंत्रीसंत्र्यांच्या दौरेसाठी वापरले जाते कधी तरी त्याचा उपयोग जनतेलाही व्हावा.

शशिकांत जगताप

सोलापूर महापालिकेच्या कृपेने दूषित पाणी पिऊन किती लोक मेले हे सोलापूरकर विसरुन गेले. दूषित पाण्याचा स्त्रोत शोधण्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा बळी देऊन पण दूषित पाण्याने मेलेल्या लोकांची संख्या कमी झाली नाही. सोलापूरकर नागरिकांची सहनशक्ती अमाप आणि अचाट आहे. महात्मा गांधीचे आम्ही निस्सीम भक्त आहोत. किती पण अन्याय करा आम्ही सहनच करणार. त्यामुळे धुराने जोपर्यंत काही अपाय होत नाही तोपर्यंत सर्व जबाबदार पुढारीपण मूक म्हणून बसलेले असणार .

संजय पवार

असंच जर अजून दिवस प्रदूषण राहिलं..तर घराच्या बाहेर पडणं मुश्किल होईल.नाहीतर मग दिल्ली मध्ये जसं प्रदूषण रोखण्यासाठी मिनी lockdown केला होता तसं करावं लागेल….

अमोल काळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *