MH 13 News Network
सोलापूर जिल्हा परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार अनेक महिन्यापासून बंद होते .यामुळे जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या लोकांची गैरसोय होत होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने हे गेट उघडण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने आंदोलनाच्या अगोदरच प्रवेशद्वार उघडले.
जिल्हा परिषद येथील आंदोलन गेट जवळ ग्रामीण भागातील अनेक जण मोठ्या संख्येने येत असतात. जिल्हा परिषदेतील विभागात अनेक कामासाठी शेकडो जणांची वर्दळ या ठिकाणी असते परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने येथील गेट कुलूप लावून बंद ठेवले होते परिणामी, या ठिकाणहून होणारी आवक-जावक पूर्णपणे बंद होती.
याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती परंतु संभाजी ब्रिगेडने सर्वसामान्यांची समस्या जाणून जिल्हा प्रशासनाला हे गेट त्वरित उघडा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिलेला होता.
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी तात्काळ संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सोमनाथ राऊत आणि त्यांचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. सबंधित विभागाला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार उघडण्याचे आदेश दिले.
त्यामुळे आज शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार उघडण्यात आले. यामुळे जिल्हा परिषद मध्ये येणाऱ्या लोकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले . जिल्हा परिषद आवारातील अनेक नागरिकांनी संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांचे फोन करून आभार मानले.