Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH 13 News Network

अक्कलकोट (प्रतिनिधी) – समाजातील जन मानसांना आपापल्या देवतांचे श्रद्धास्थान असतात. तसे मी ही श्री स्वामी समर्थांचे श्रध्दास्थानी आहे. या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र अक्कलकोट मधील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे मुख्य श्रद्धास्थान असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी देशमुख बोलत होते. पुढे बोलताना देशमुख यांनी श्री स्वामी समर्थांच्या श्रद्धेय भक्ती प्रित्यर्थ स्वामी समर्थांचे आशीर्वाद नेहमीच माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या पाठीशी असतात, त्यामुळे या आशीर्वादांच्या प्रेरणेतून जीवन जगण्यास प्रेरणा मिळते असे सांगून स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता पुन्हा पुन्हा स्वामींनी आपल्याला अक्कलकोटला बोलवावे याकरिता स्वामी चरणी साकडे घातले असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, संजय पवार, प्रसाद सोनार, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, व्यंकटेश पुजारी आदींसह स्वामी भक्त उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *