Latest Post

10+ Best Crypto As Well As Bitcoin Craps Casinos June 2024 Top 10 Mobile Casinos Real Money Game Titles In 202

MH 13 News Network

 

मान्यवरांच्या हस्ते दोन लाख 35 हजारांच्या धनादेशाचे वितरण

सोलापूर (प्रतिनिधी)

लोकमंगल फाउंडेशन संचालित लोटस योजनेतून एकूण 13 दत्तक विद्यार्थांना 2 लाख 35 हजार  आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीच्या धनादेश वाटपाचा कार्यक्रम नुकतेच प्रमुख पाहुणे प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवाजी पाटील, मोहन आलाट,  प्रवीण ननवरे, डॉक्टर शिवराज सरतापे, सुधीर ननवरे अंकुश आवताडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बोलताना प्रमुख मान्यवरांनी लोकमंगलच्या लोटस योजनेमुळे अनेक गरीब मुलांना उच्च शिक्षण घेण्यास मदत होत आहे या योजनेचे अनुकरण सर्वांनी करण्यासारखे असल्याचे सांगितले.

समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचे आयुष्य शिक्षणाच्या मदतीने पुरविणे हे ध्येय समोर ठेवून आ. सुभाष  देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि रोहन देशमुख आणि मनीष  देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल ऑर्गनायझेशन फॉर टीचिंग अंडर प्रिव्हिलेज स्टुडंट्स (लोटस) ची वाटचाल 2015 पासून आजतागायत  सुरू आहे. जात, धर्म ,भाषा, प्रांत यांचा कसलाही विचार न करता केवळ समाजातील गरीब गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना “लोटस” कडून शिक्षणासाठी दत्तक घेतले जाते. त्यांचा संपूर्ण आर्थिक खर्च संस्थेकडून केला जातो. आजपर्यंत एकूण 175 विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले असून 73 लाख 95 हजार 352 रुपयांचा निधी विद्यार्थ्यांना वितरित केला आहे. यामध्ये मेडिकल इंजिनियर फार्मसी अग्रिकल्चर आदी सर्व क्षेत्रात प्रवेशित विद्यार्थ्यांसोबत कला-क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *