Big9 News
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्या संशयित प्रियकरास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात वार करुन तसेच त्याला बेदम मारहाण करुन त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला
सदरचा प्रकार २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुणे येथील वाघोली परिसरात घडला.
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय काही दिवसांपासून आरोपीस होता. या कारणावरुन त्यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने आरोपीने स्वतः जवळ धारदार शस्त्र घेऊन येत त्यांच्या राहते घराजवळ येऊन त्यांना गाठले. त्यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यात ठिकठिकाणी वार करुन आणि मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी करण्यात आले.
त्याचवेळी पीडिताचा १२ वर्षाचा मुलगा सदरची भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आला असता, आरोपीने त्याला सुध्दा शस्त्राने डोक्यात मारहाण करुन गंभीर दुखापत केली आहे
या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात ४० वर्षीय इसमावर गुन्हा दाखल करुन त्यास पोलीसांनी अटक केले आहे. याबाबत ३१ वर्षीय एका तरुणाने पोलीसांकडे फिर्याद दाखल केली आहे. सदर प्रकारामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.