Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 news

अक्कलकोट
स्वामी समर्थ हे फार लवकर प्रसन्न होतात. फक्त भाविकांनी त्यांची मनापासून भक्ती केली तर ते आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढतात. जेव्हा मी स्वामी भक्तीत यायच्या अगोदर माझी आई त्यांच्या फोटोला जेव्हा गंध लावायची तेव्हापासून मला स्वामी भक्तीचा सुगंध यायला लागला. माझी स्वतःची इच्छा झाली की मलाही सद्गुरु मिळावेत यासाठी मी गेल्या नऊ वर्षापासून सतत स्वामींचे नामस्मरण चिंतन करीत आहे. त्यामुळे आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात त्यांच्या इच्छेनुसारच त्यांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. या माध्यमातून मला माझे गुरु लाभले हे मी त्यांची कृपाच मानतो

असे मनोगत

नागपूर विभाग लोकसेवा हक्क आयोगाचे भारतीय प्रशासन सेवेतील माजी राज्य आयुक्त अभय यावलकर यांनी व्यक्त केले.

ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्निक येवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी यावलकर बोलत होते. पुढे बोलताना यावलकर यांनी स्वामी दर्शनाकरिता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी स्वतः उपस्थित राहून आम्हाला अत्यंत आदरयुक्त सेवा दिली. त्यांचेही आम्ही मनापासून ऋणी आहोत. यापुढेही त्यांना स्वामी समर्थांनी अशीच स्वामी सेवेची संधी द्यावी असेही मनोगत व्यक्त करून इंगळे यांच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

यावलकर यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *