Big9news
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला धक्कादायक माहिती समोर आली आहे संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांच्या मर्जीतील नेते म्हणून त्यांना ओळखले जात दादर परिसरात ही त्यांची फार मोठी ओळख आहे अशा बड्या नेत्यावर हल्ला झाला तेही खूप आक्रमक पद्धतीने झाला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉक साठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला त्यांच्यावर हल्लेखोरांनी सळई आणि स्टम्प च्या साह्याने मारण्याचा प्रयत्न केला त्यास विरोध करत संदीप देशपांडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे त्यांना उपचारासाठी त्वरित हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पायावर स्टम्प चा फटका आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे
त्यांची प्रकृती आता स्थिर आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे मात्र हल्लेखोर कोण होते ते अजून ओळख पटू शकले नाही.हल्लेखोरांच्या तोंडावर मास्क होते! तरी पोलिसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली आहे. तपासातून असे समोर आले की राज ठाकरेंच्या घरापासून थोड्याच अंतरावर संदीप देशपांडे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक साठी शिवाजी पार्कमध्ये होते अशावेळी टोळ चार-पाच लोकांचे टोळके बसले होते त्यांच्या तोंडाला मास्क हातामध्ये लोखंडी रॉड आणि स्टम्प होते त्यांच्यातील एकाने संदीप देशपांडे यांच्यावरती स्टॅम्पने वार करण्याचा प्रयत्न केला हा वार चुकवीत देशपांडेंनी हातावर झेलला याच वेळेस हा फटका त्यांच्या पायावर बसला हा हा प्रकार बघताच आजूबाजूच्या लोकांनी संदीप देशपांडे यांना मदत करण्यासाठी धावले आणि ते पाहून हल्लेखोरानी तेथून लगेच पळ काढला
संदीप देशपांडे यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले संदीप देशपांडे महानगरपालिकेतील घोटाळे बाहेर काढत असल्यामुळे त्यांच्यावरती हा हल्ला झाल्या असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या राजकीय घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे