Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

सरकोली ता. पंढरपूर येथील यारीव्दारे अवैध वाळू उपसा करणा-या २ वाळू पॉईंटवर कारवाई करून २ ट्रॅक्टरहेड यारी मशिन, ०१ टेम्पोट्रक वाहन व वाळू साठ्यासह एकूण १६ लाख १२ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी 15 मार्च रोजी सदर कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप त्यांचे आदेशान्वये जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करीत असताना पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या टिमला बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मौजे सरकोली ता. पंढरपूर जि. सोलापूर येथील भिमा नदीच्या पात्रातून काही इसम ट्रॅक्टरयारी मशिनच्या सहाय्याने शासनाची परवानगी व रॉयल्टी नसताना चोरून वाळू काढून त्याचा साठा करून विक्री करीत असल्याची बातमी मिळाली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप यांनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांनी पथकासह मौजे सरकोली, ता. पंढरपूर जि. सोलापूर येथे जावून बातमीप्रमाणे खात्री केली असता, सदर ठिकाणी ट्रॅक्टरला लोखंडी यारी मशिन जोडून भिमा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करीत असल्याचे दिसून आले. त्यावरून वाळू उपसा पॉईंटची खात्री झाल्यानंतर पॉईंट पासून काही अंतरावर वाहन थांबवून पायी चालत पॉईंटवर गेले असता त्या ठिकाणी ट्रॅक्टरला यारी मशिन जोडून वाळू साठा केला असून एक वाळूने भरलेला टेम्पो ट्रक मिळाल्याने घटनास्थळी मिळालेल्या ११ इसमांना ताब्यात घेवून त्यांचे विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गांवातील इतर ठिकाणीसुध्दा दुस-या वाळू पॉईंटची बातमी मिळताच त्या ठिकाणी ट्रॅक्टरला यारी मशिन जोडून वाळू काढण्याचे काम चालु असून वाळूचासाठा करण्यात आला होता, त्या ठिकाणी छापा घालून ०४ इसमांना ताब्यात घेवून त्यांचे विरुध्द सुध्दा पंढरपूर तालुका पोलीस ठाणेस गुन्हा दाखल केला आहे.

दोन्ही वाळू पॉईंटच्या ठिकाणाहून २ ट्रॅक्टरहेड, ०२ यारी मशिन संच, ०१ वाळूने भरलेला टेम्पोट्र्क असा एकूण १६ लाख १२ हजार रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यारीमशिन चालवणारे, वाळू भरणारे कामगार, वाळू पॉईट चालवणारे, शेतमालक यांचेसह एकूण १५ आरोपींना ताब्यात घेवून १८ इसमांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाणे १) गुरंन २०६ / २०२३ व २) २०७/२०२३ भादविक ३७९, ३४, व गौण खनिज कायदा कलम १९७८ चे कलम ४ (१), ४(क), (१) व २१ प्रमाणे ०२ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, स.फौ.ख्वाजा मुजावर, बिराजी पारेकर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, गणेश बांगर, अक्षय दळवी, यांनी बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *