Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH13 News Network

अपघातातील जखमीची एक लाखापेक्षा जास्त रक्कम नातेवाईकाकडे केली सुपूर्द

दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारास वेळेत मदत झाल्यास अपघातग्रस्तास जीवदान मिळु शकते. अशाच प्रकारे दुचाकी घसरून सावळेश्वर टोलनाक्याच्या पश्चिमेस बाजूस सावळेश्वर येथील मोहोळ कडून सोलापूरकडे निघालेल्या ज्ञानेश्वर तुकाराम सावंत यांचा अपघात घडला. या वेळी अभुतपूर्व कार्यतत्परता दाखवत महामार्ग पोलीस विभागाच्या पाकणी टॅबचे पोलीस उपनिरीक्षक धर्मपाल सांगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणपत माने, पो.ना. विकास यादव त्याचबरोबर या ठिकाणाहून आरटीओ वायुवेग पथकाच्या कर्तव्यावर निघालेले मोटार वाहन निरीक्षक शितलकुमार कुंभार, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विशाल नाझीरकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमृता देशमुख, वाहन चालक प्रमोद महाडिक यांनी सदर जखमीस त्वरित सोलापूर येथे उपचारासाठी पाठवून दिले. यावेळी या मदतकार्यात महत्त्वाचा सहभाग असलेले सावळेश्वरचे सरपंच शुक्राचार्य हावळे यांच्या समक्ष जखमीच्या खिशातून पडलेली महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम माणुसकीचे दर्शन घडवत जखमी ज्ञानेश्वर सावंत यांच्या नातेवाईकाकडे सुपूर्द केली.

वेळेत जखमीला उपचारासाठी सोलापूरकडे पाठवून जखमींची कागदपत्रे आणि रोख रक्कम उदात्त कर्तव्यभावनेने परत करत देवदूत ठरलेल्या आरटीओ विभागाचे मोटार वाहन निरीक्षक शितलकुमार कुंभार आणि महामार्ग विभागाचे पोलीस उपनिरीक्षक धर्मपाल सांगळे आणि इतर अधिकाऱ्यांच्या या कामगिरीबद्दल सावळेश्वरचे सरपंच शुक्राचार्य हावळे यांनी आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली

news update by mahesh mane

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *