MH13 News Network
मुंबई येथे विधानभवन घेराव आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेस मोठ्या संख्येने सहभागी
शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांना अटक व सुटका
मुंबई– केंद्र सरकारच्या जनतेविरोधी धोरण, राज्यातील खोके सरकारचा गलिच्छ कारभार, महागाई विरोधात,युवकांच्या रोजगारासाठी त्यांच्या भविष्यासाठी युवक काँग्रेसचा विधानसभा घेराव राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही, श्रीनिवास, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती ताई शिंदे,आमदार विश्वजीत कदम सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेस मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी युवक काँग्रेसच्या व्यासपीठावर आमदार प्रणिती शिंदे बोलत होत्या युवक काँग्रेसने काढलेला हा मोर्चा विधानसभेत मोठा आवाज घुमेल व या सरकारला जाग येईल. हा विधानसभा घेराव मोर्चा पाहून सरकार हमसे डरती है पोलीस को आगे करती है. हजारोच्या संख्येने युवक काँग्रेस आज रस्त्यावर उतरली आहे त्याच्या समर्थनार्थ मी इथे आली आहे असे ते म्हणाले.
*विधानसभा घेराव मोर्चाला सुरुवात होताच प्रथम बॅरॅकेट्सवर राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास,प्रदेश युवक अध्यक्ष कुणाल राऊत,आमदार विश्वजीत कदम, प्रदेश प्रभारी मितेंद्र सिंग व सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे या या पाच लोकांनी उड्या मारून सरकारचा निषेध केला. लगेच त्यांना अटक झाली व दिवसभर ठेवून त्यांची सायंकाळी सुटका करण्यात आली.
यावेळी प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर,अनंत म्हेत्रे, प्रवीण जाधव,उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष महेश जोकारे, मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद बिजापूरे,आदित्य म्हमाणे,महेंद्र शिंदे,अजिंक्य पाटील,बबलू जाधव, भाऊसाहेब भालेराव,अरबाज शेख,श्रावण भोरे,दीपक उघाडे, हर्षद पवार,मंगेश घोटी,शेखर विटकर अभिजीत गिरी,चंद्रकांत नाईक,दिनेश डोंगरे, सचिन गायकवाड,अजय जाधव,युवराज दोडमणी,आकाश नाईक, स्वप्नील शिंगे,बालाजी सज्जनकर,प्रथमेश जाधव,यश जाधव,सिद्धू बगले,सचिन घाटे,अमित देशमुख, शरणाप्पा कांबळे, शशांक सुफोतु व इतर पदाधिकारी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.