Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH13 News Network

राज्यातील 30% अपघात कमी करण्याबाबत मा परिवहन आयुक्त,महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना आदेशित केले आहे.मागील आठवड्यामध्ये सोलापूर येथील बैठकीतही या बाबतचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता.त्यानुसार उप प्रा परिवहन कार्यालय,सोलापूर कार्यालयाकडून दि 1 मार्च पासून विशेष मोहीम राबवण्यात येथ आहे.
सदर मोहीम तीन वायुवेग पथकामार्फत राबवण्यात येत आहे.त्यामध्ये विशेष करून ज्या भागात ज्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून मोहीम राबवण्यात येत आहे.तसेच ज्या तालुक्यात जास्त अपघात झालेले आहेत त्या तालुक्यावर लक्ष केंद्रित करून कारवाई करण्यात येत आहे.

या कारवाई दरम्यात असे निदर्शनास आले कि रस्ता सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवण्याची मानसिकता नागरिकांची झालेली आहे अपघाताची संख्या पाहता जास्त अपघात आहे मोटार सायकल चे आढळून येत आहेत तसेच ओव्हर स्पीड मुळेही जास्त अपघात होत आहेत.फेब्रुवारी 22 च्या तुलनेत तालुक्याच्या ठिकणी जास्त अपघात होत आहेत अशा बार्शी व सोलापूर(उत्तर) तसेच सोलापूर (दक्षिण) या तालुक्यावर लक्ष केंद्रित करून कारवाई करण्यात आली होती.त्याच प्रमाणे इतर ठिकाणीही रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आलेली आहे.

दि 1 मार्च ते 23 मार्च पर्यंत केलेली कारवाई
एकूण केसेस -1921
1) विना लायसन्स -907
2)योग्यता प्रमाणपत्र नसणे-357
3)पी यु सि नाही -224
4)बेकायदेशीर प्रवासी वाहतूक -12
5)सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रवासी बस तपासणी -3
6)विना हेल्मेट -679
7)विना सीटबेल्ट -217
8)मोबाईल वर बोलणे-56
9)विमा नसलेली वाहने-494
10)ओव्हरलोड -18
11)रिफ्लेक्टर नाही -157
12) स्पीड गन केसेस -299
अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे.सदर ची मोहीम यापुढेही चालू राहणार आहे.

अपघाताची संख्या कमी व्हावी आणि बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी या उद्देशाने कारवाई केली जात आहे.पुढील काळातही आर टी ओ ची कारवाई सुरूच राहणार आहे.
श्रीमती अर्चना गायकवाड
उप प्रा परिवहन अधिकारी.सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *