Big9 News
सोलापूर कार्यकर्त्यांनी पक्ष निष्ठा ठेवून काम करावे. व्यक्ती निष्ठा नको, असा सल्ला भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनीदिला. हे शब्द ऐकून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी पत्रकारांकडे भावना मांडल्या. भाजपमध्ये पदाचे वाटप करताना दोन देशुमखांच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य मिळते. शिल्लक राहिलेली पदे पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांना मिळतात. काँग्रेस पक्ष संघटनेच्या निवडणुकात उत्तम कामगिरी करणाऱ्या फिरदोस पटेल, मंगळवेढ्याचे प्रशांत साळे, सुलेमान तांबोळी अजूनही पदापासून वंचित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साहेब, ताई, दादा आणि जयंत पाटील यांचा कार्यकर्ता या क्रमानुसार पद वाटप होते. शिवसेनेचे निष्ठावंत अजूनही शेतात कामाला जातात. प्रभागात निवडून न येणारे लोक अजूनही पदावर दिसतात. आता या सर्व गोष्टींकडे कोणती निष्ठा म्हणून पाहायचे असा कार्यकर्त्यांचा सवाल आहे.
Leave a Reply