Big9 News
सोलापूर जिल्हा परिषदेने शिक्षण विभागात राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती आज राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी जाणून घेतली. सोलापूर जिल्हा परिषदेने शिक्षण विभागात केलेले आमुलाग्र बदल राज्यास मार्गदर्शक आहेत असे मत शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केले. या उपक्रमाबद्दल सिईओ दिलीप स्वामी यांचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक दिलीप स्वामी यांनी पंढरपूर येथे शासकीय विश्रामधान येथे राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन श्री विठ्ठल रूक्मिणी ची मुर्ती देऊन स्वागत केले. याप्रसंगी शिक्षण विभागाचे उपसंचालक उकिरडे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाची उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी संजय जावीर, पंढरपूर चे गट शिक्षणाधिकारी नाळे, याप्रसंगी प्रमुख उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिली. पंढरपूर येथील शासकीय विश्राम धाम येथे मंत्री केसरकर यांनी सिईओ दिलीप स्वामी यांना खास बोलावून त्यांचे कडून सोलापूर जिल्हा परिषदेच्या विविघ उपक्रमाची माहिती जाणीन घेतली. तात्काळ मंत्रालयात आदेश देऊन या उपक्रमाची राज्यात प्रभावी पण अंमलबजावणी करणे साठी शिक्षण परिषदेचे आयोजन करणेचे सुचना त्यांनी दिले. राज्यातील सर्व सिईओ यांना या शिक्षण परिषदे मध्ये सहभागी होणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या माध्यमातून वेगवेगळे 21 नाविण्यपुर्ण उपक्रम राबविलेले आहेत. हे सर्व उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी राबविलेले आहेत.
सोलापूर जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागाच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दशासुत्री कार्यक्रम राबवला. सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण घेऊन याबाबतची माहिती दिली. त्याची फलनिष्पत्ती होत आहे. या विविध उपक्रमामध्ये स्वच्छ शाळा, सुंदर शाळा, पारावरची शाळा, दशसुत्री, गीत गुंजन, गुणवत्ता वाढीसाठी निबंध स्पर्धा, सायकल बॅंक आदी उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
शिक्षण परिषदेचे सिईओ स्वामी यांनी सादरीकरणाची संधी देणार – केसरकर
लोकसहभाग व लोकवर्गणी तून शिक्षण विभागात आमुलाग्र बदल करता येतात याचे मुर्तीमंत उदाहरण सोलापूर जिल्हा परिषद आहेत. लिडरशिप चांगली असली कि त्याचे परिणाम व फलनिष्पत्ती चांगली होते. सायकल बॅक व दशसुत्री उपक्रम व स्वच्छ व सुंदर शाळा हे तीन उपक्रम प्रायोगिक तत्वावर राज्यात राबविणे साठी सिईओ दिलीप स्वामी यांना सादरीकरणाची संधी देणार असल्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारल्याने जिल्हा परिषद शाळांचा पट वाढला आहे. सायकल बॅंकेच्या उपक्रमामुळे मी व्यक्तीश भारावलो आहे.
हे सर्व उपक्रम पाहून मंत्री दिपक केसरकर समाधान झाले असल्याचे सांगितले.
शिक्षक व लोकांचा चांगला प्रतिसादामुळे उपक्रमास गती – सीईओ दिलीप स्वामी
कोविड काळात देखील शाळा बंद असताना शिक्षक व लोकांना चांगला प्रतिसाद दिला. कोविडकाळात शाळांची दुरवस्था झाली होती. शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी ओळखून *स्वच्छ शाळा सुंदर शाळा* उपक्रम राबविला. यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक, अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना लोकसहभागासाठी आवाहन केले. या उपक्रमाला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. लोकवर्गणीतून आठ कोटी एवढा निधी लोकसहभागातून वस्तूरूपात जमा झाला. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे यामुळे रूपडे पालटले.
त्याचप्रमाणे विद्यार्थी संस्कारक्षम व्हावेत यासाठी दशसुत्री हा उपक्रम राबविला. गुणवत्ता वाढीसाठी निबंध स्पर्धा, स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शन आदी उपक्रम राबविले. यामुळे याआधी 30 ते 35 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळवायचे त्यांची संख्या वाढून 350 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षेत यश संपादन केले.
मुलींच्या शाळा गळतीसाठी सायकल नसणे हे प्रमुख कारण आहे हे लक्षात आल्यावर लोकसहभागातून सायकल बॅंक उपक्रम राबविला. आज 3000 पेक्षा जास्त विद्यार्थिनींना सायकली सायकल बॅंकेच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.