Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

14 मे 2023 रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. जयंतीपुर्वी पुतळा दुरुस्ती, रंग, सुशोभीकरण आदी कामे मार्गी लावण्याची मागणी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांच्याकडे केली आहे.

छत्रपती संभाजी महाराज चौक येथे सोलापूर शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे. सदर पुतळा परिसर सुशोभीकरणाचे काम मागील ३-४ वर्षांपासून प्रलंबित आहे. सद्यस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा देखील बऱ्याच ठिकाणी भंगलेला आहे. मूर्तीचे पाय, फौंडेशन, हाताची मूठ आदी ठिकाणी मूर्ती भंगलेली असून रंग देखील उडालेला आहे. तसेच पुतळा परिसर सुशोभीकरणाचे काम रखडल्यामुळे परिसर मोठ्या प्रमाणात अस्वछ झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. तरी या रस्त्यावरील व छत्रपती संभाजी महाराज चौकातील नादुरुस्त व बंद असलेली स्ट्रीट लाईट देखील दुरुस्त करणे आवश्यक आहे.

. या जयंती उत्सवापूर्वी मूर्तीचे देखभाल दुरुस्तीचे, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संभाजी महाराज चौक रस्त्याचे, पुतळा परिसर स्वछता आणि उर्वरित सुशोभीकरणाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. सोलापुरातील तमाम शिव-शंभूप्रेमींच्या वतीने आग्रही मागणी आहे की, वर उल्लेख केलेली सर्व कामे छत्रपती संभाजी महाराज जयंती दि. १४ मे २०२३ पूर्वी पूर्ण करावीत या मागणीचे निवेदन सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांना देण्यात आले. यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, श्रीकांत डांगे, विनोद भोसले, राम जाधव, मतीन बागवान, मनीष काळजे, माउली पवार, लहू गायकवाड, निखिल भोसले, अमोल केकडे, सुरज पाटील, जितू वाडेकर, उज्वल दीक्षित, अजिंक्य पाटील, अतिश बनसोडे, बाबा चव्हाण, राजू आलुरे, शिवकुमार कामाठी, निशांत साळवे, चंद्रकांत पवार, प्रीतम परदेशी, अंबादास शेळके, प्रकाश नन्नवरे, सोमनाथ राऊत, राज गोसावी यांच्यासह सर्व शिवप्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *