Big9 News
सोलापूर पोलिस दलात उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलिसांना पोलिस महासंचालक पदक बुधवारी (ता. २६) जाहीर करण्यात आले. यात ग्रामीण पोलिस दल,शहर पोलिस दल आणि राज्य राखील दल गट क्रमांक १० मधील असे एकूण ३१ पोलिसांना पोलिस महासंचालक पदे जाहीर करण्यात आले आहेत.
यात पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, शहर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील भिवाजी दोरगे, ग्रामीण पोलिस दलातील पोलिस निरीक्षक सुहास लक्ष्मण जगताप व पोलिस निरीक्षक विनय रामचंद्र बहिर,शहर पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक संजय प्रल्हाद क्षीरसागर,सोलापूर ग्रामीणचे राखीव पोलिस उपनिरीक्षक अप्पा शंकर काटे,शहर दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिता मारुती जाधव,मदन भगवान गायकवाड,ग्रामीण दलातील प्रभाकर पुरुषोत्तम ताटे-देशमुख,शिवाजी शामराव घोळवे यांचा समावेश आहे,तर गट क्रमांक १० मधील सपोहवा बसवराज पुंडलिक शिवशरण,परमेश्वर अशोक पाटील,रामदास बाजीराव बुरंगे, पन्नालाल सोमनाथ पाचकुडवे,जावेद कासीमखान पठाण यांचा समावेश आहे.
महामार्ग सुरक्षाचे पोलिस हवालदार माेहन महादेव शिंदे,शहर दलातील संतोष पंढरीनाथ येळे, परशुराम उत्तम जाधव,विक्रांत वसंत झुंजुर्डे,प्रशांत कुमार गाडे,ग्रामीणचे नारायण रामचंद्र गोलेकर,चरणसिंग विजयसिंग रजपूत यांची निवड करण्यात आली आहे. शिवाय शहरातील पोलिस नाईक अय्याज अ.राशीद बागलकोटे,बसवराज शिवयोगी अडगल,सागर सुधाकर सरतापे,सचिन रामदास गायकवाड, रोहन प्रकाश ढावरे, तर गट क्र.१० मधील सपोना गजानन अशोक मेटकरी, कलय्या महांतय्या स्वामी व शहरातील पोलिस शिपाई प्रीती हरिहर मठपती, योजना लहू चव्हाण यांचा समावेश आहे.