Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

      महाराष्ट्र दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे होणाऱ्या परेड समारंभाच्या पार्श्वभूमीवर दि. ०१ मे २०२३ रोजी माहिम, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही उड्डाणक्रियांना प्रतिबंध असल्याचे आदेश बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्त (अभियान) यांनी काढले आहे.

       या परेड समारंभाच्या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उत्सवासाठी एकत्र येणे अपेक्षित आहे. त्याकरिता वरील परिसरातील अवांछित कारवाया रोखण्यासाठी पुरेशी सुरक्षा तपासणी करणे आवश्यक असल्याने हा आदेश काढण्यात आला आहे. हा आदेश ०१ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *