Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

राजर्षी शाहू महाराजांचे स्मृतीशताब्दी वर्ष 2022 हे साजरे झाले. या कृतज्ञता पर्वात शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी समिती, सोलापूर यांच्यावतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे 6 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता शाहू महाराजांना 100 सेकंद स्तब्ध उभे राहून वंदन करण्यात आले. प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून हे वंदन करण्यात आले.सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर, पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, शताब्दी समितीचे विश्वस्त माऊली पवार, आशुतोष तोंडसे, सचिन शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे,  माजी नगरसेवक विनोद भोसले, सौरभ साळुंखे, सिध्दाराम वाघ, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रकाश ननावरे,पृथ्वीराज नरोटे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी प्रणिता सोनकांबळे, समता दूत यशपाल चंदनशिवे, राजश्री कांबळे, नालंदा शिंदे,संजय गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे व संयोजक माऊली पवार
यांनी या वंदन कार्यक्रमामधील समितीच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट करत राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली.समारोपाला समता सैनिक दलाने मानवंदना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *