Big9 News
कर्नाटकामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपला पराभूत करत कर्नाटकाच्या जनतेने काँग्रेसला एक हाती सत्ता दिल्याने. माढ्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात
आला.
माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस नेते दादासाहेब साठे यांच्या नेतृत्वाखाली गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी वेदांत भैय्या साठे,पाणी पुरवठा सभापती नितीन(नाना)साठे, नगरसेवक नितीन (ताना) साठे, समाधान अंबुरे, निलेश घाडगे,प्रशांत जाधव, आदी कार्यकर्ते हजर होते.
यावेळी पक्षाचा विजय आसो अशा घोषणा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
कर्नाटकातील महत्त्वपूर्ण विजयाने काँग्रेसला संजीवनी मिळाली. सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि काँग्रेसच्या एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये स्फूर्ती निर्माण झाली आहे अशी प्रतिक्रिया दादासाहेब साठे यांनी व्यक्त केली.
Leave a Reply